प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड
प्रवास ( नॉर्वे - आइसलैंड ) नॉर्वे आणि आइसलैंड अशी नोव्हेंबर २७ ते डिसेंबर १२ साधारण १५ दिवसाची टूर करायचं ठरलं आणि आम्ही विमानाची तिकिटं काढून १ सप्टेंबरला शॅंगेन व्हिसासाठी अॅपलाय केलं . या आधी आमची स्केन्डेनेव्हिया रशिया ही टूर झाली होती पण ती तिथल्या उन्हाळ्यात , तिथला उन्हाळा फारच सुन्दर असतो कारण फार थंडी नसते , दिवस भरपूर मोठ्ठा असतो . अगदी काही तास अंधार होतो न होतो तोच हलकेच उजाडतं . निळं आकाश , निळं पाणी , हिरवीगार झाडं , रंगबिरंगी फुलं , अक्षरश : स्वर्ग ! ती टूर धावती होत...