प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड
प्रवास ( नॉर्वे - आइसलैंड ) नॉर्वे आणि आइसलैंड अशी नोव्हेंबर २७ ते डिसेंबर १२ साधारण १५ दिवसाची टूर करायचं ठरलं आणि आम्ही विमानाची तिकिटं काढून १ सप्टेंबरला शॅंगेन व्हिसासाठी अॅपलाय केलं . या आधी आमची स्केन्डेनेव्हिया रशिया ही टूर झाली होती पण ती तिथल्या उन्हाळ्यात , तिथला उन्हाळा फारच सुन्दर असतो कारण फार थंडी नसते , दिवस भरपूर मोठ्ठा असतो . अगदी काही तास अंधार होतो न होतो तोच हलकेच उजाडतं . निळं आकाश , निळं पाणी , हिरवीगार झाडं , रंगबिरंगी फुलं , अक्षरश : स्वर्ग ! ती टूर धावती होती कारण डेनमार्क , नॉर्वे , स्वीडन , फिनलेन्ड आणि रशिया असा केसरी ट्रावल्स बरोबरचा प्रवास होता . या वेळी सेव्हन लक्स या ट्राव्हल कंपनीने मॅनेज केलेली कस्टमाइज्ड टूर होती . त्या कंपनीचे ओनर्स मनाली आणि अमित आमच्या संपर्कात रहाणार होते . मी माझा नवरा दिगंबर ऊर्फ किशोर आणि आमच्या बरोबर आमच्या