पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवास वर्णनः ग्रीस 10

 ग्रीस  6 जून 2023, दिवस नववा) आज जरा उशिरा उठलो. सामानाचं बरचसं पॅकिंग करून ठेवलं. आरामात ब्रेकफास्ट आटपला आणि बस पकडली. दिवसभर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उतरून महत्वाची ठिकाणं पाहिली. पार्लमेंट, म्यूझियम, युनिव्हर्सिटी या ठिकाणांना धावती भेट दिली. बरेचसे समुद्र किनारे बसच्या ओपन रुफ टॉप वरून पाहिले तर क्वचित उतरूनही.  खास रमलो ते अथेन्स ऑलिंपिक स्टेडियमला. या स्टेडियम मधे पहिली ऑलिंपिक स्पर्धा झाली होती. ऑलिंपिकचा ध्वज आणि त्याच्या बाजूला ग्रिसचा राष्ट्रध्वज मोठ्या दिमाखात फडकत होते. आम्ही स्टेडियमच्या माहितीचा ऑडिओ ऐकत फिरलो. अंडाकृती गोल आसन व्यवस्था, किंग आणि क्विन साठीची आसनं सर्व काही मारबलचं आहे. कमालीचं आखीव रेखीव. जवळपास पासष्ट हजार लोकं बसू शकतात. स्टेडियमची भव्यता आमच्या मोबाईल फोटोत घेणं हा केविलवाणा प्रयत्न वाटला. दोन्ही हात उंचावून खेळाडूंना प्रोत्साहन देणारं खचाखच भरलेलं स्टेडियम आणि विजयश्री खेचून आणण्यासाठीचा  खेळाडूंचा आक्रमक खेळ कल्पनेने  डोळ्यांसमोर साकारला! विजेत्याना ट्रॉफ़ी दिली जाते त्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून मी भारतासाठी ट्रॉफ़ी जिंकणा-या खेळाडूचा अभिमान, आनन्द म

प्रवास वर्णनः ग्रीस 9

 ग्रीस (5 जून 2023 आठवा दिवस.) आमची सकाळची साडे आठची फ्लाइट फक्त पाउण तासाने नऊ पंधराला अथेन्सला पोहचली. आधी उतरलो होतो त्याच ग्रॅन्ड हयातला बुकिंग होतं. चेकइन झालं. रूमच्या गॅलरीतून पुन्हा अेकदा तो रस्ता आणि दूरवर दिसणारी ॲक्रोपोलिसची इमारत दिसली. आमचं हॉप ऑन हॉप ऑफ या साइट सिइंग बसचं तिकीट होतं जे 5 आणि 6 असं दोन दिवस चालणार होतं. हॉटेलच्या बाहेरच बस थांबत होती. चहा पिऊन आम्ही बस पकडली आणि अॅक्रोपोलिसच्या स्टॉपला उतरलो. बराच चढ चढ़त आणि त्या चढावरील इतर प्राचीन इमारती पहात, माहिती वाचत मुख्य इमारती पर्यन्त पोचलो. ते स्थापत्य पाहून भारावून जायला होतं. त्या इमारतींच संरक्षण, जतन आणि जीर्णोद्धार हे काम चालू आहे.  त्या वास्तू आणि तिथून दिसणारं खालचं अथेन्स शहर पहाण्यात हरवून गेलो. आकाशात मावळतीचे रंग गडद झाले आणि खाली उतरायला सुरवात केली. चालत अेका चौकात पोचलो. बरीच गर्दी होती. अेका ठिकाणी काही तरूण ड्रम वाजवत, गात नाचत होते तिथे थोडे रेंगाळलो. उशीर झाला होता म्हणून टॅक्सी करून हॉटेलला आलो.  चारुलता काळे

प्रवास वर्णनः ग्रीस 8

 ग्रीस (4 जून 2023, दिवस सातवा.) सॅन्टोरिनीतला तिसरा दिवस. आज आमची सॅन्टोरिनी हायलाइटस् अशी पूर्ण दिवसाची बसची गाइडेड टूर होती.  बराच चढ चढून अेक मॉनेस्ट्री पहायला गेलो पण ती बंद होती. बीचवर गेलो तिथल्या रेस्टोरेन्टला जेवलो, चर्चेस पाहिली.  सेन्टोरिनीत उत्कृष्ट वाईन्स बनतात. या टूरमधे आम्ही वाइन टेस्टिंग करायला अेका वायनरीत गेलो. किशोरला आणि मला त्यातली अेक वाईन प्रचंड आवडली जी आम्ही खरेदी केली. या टूरचं प्रमुख आकर्षण होतं ओइया ही जागा जिचा उच्चार आमचा गाईड ‘इया’ असा करत होता.  तिथला सूर्यास्त खास मानतात. फिरा प्रमाणेच ओइया मधे दुकानांच्या गल्ल्या आहेत. तिथल्या कॅसल मधून सूर्यास्त पहाण्यासाठी गर्दी होती. आम्ही ती टाळून अेका रेस्टोरेन्टच्या रूफ टॉपवरून तो पाहिला. पुन्हा त्याच निसर्ग जादूचा आनन्द! चारुलता काळे.

प्रवास वर्णनः ग्रीस 7

 ग्रीस (3 जून 2023 दिवस सातवा). सॅन्टोरिनीचा दुसरा दिवस. पाऊस नव्हता. हवा मस्त होती. आम्ही पाच तासाची कॅटॅमरीन टूर बुक केली. त्या टूरचा आमचा हॉटेल पिकअप दुपारी  दोन चाळीसला होता. ब्रेकफास्ट करून ‘फिराला’ गेलो. रोप वे मधून खाली गेलो. थोडे भटकलो. पुन्हा वर येऊन कॉफी पिऊन परत हॉटेलवर जाण्यासाठी शटल पकडायला गेलो तर तिथे कुठल्यातरी क्रूज वरून आलेल्या लोकांना ड्रॉप करायला पाच ते सात बसेस रांगेत उभ्या. प्रचंड गर्दी. “बापरे! आता  काय करायचं?  टॅक्सी करुया का? “ असा विचार मनात आला आणि तेवढ्यात आमची शटल आली.  आमच्या हॉटेल वरून आम्हाला छोट्या व्हॅनने जेट्टी पर्यन्त नेण्यात आलं. तिथे अनेक कॅटॅमरीन उभ्या होत्या. आमच्या कॅटेमरीनच्या बाहेर चपला, बूट काढून आम्ही वर चढलो. बोटीवर पाय सरकूनये म्हणून ही खबरदारी घेतली जाते. त्या बोटीवर पंधरा प्रवासी आणि चार कर्मचारी असे मोजके लोक होतो. सुरक्षिततेच्या सूचना देणारी मुलगी अत्यंत काटक आणि तितकीच सुन्दर तसेच धमाल मस्ती करणारी होती. आमच्या ग्रूपमधे विविध देशांचे आणि वयाचे लोक होते. बोटीच्या पुढचा काही भाग जाळीने विणलेला होता आणि त्यावर वॉटरप्रूफ़ बेड म्हणता येईल

प्रवास वर्णनः ग्रीस 6

ग्रीस ( 2 जून 2023, दिवस सहावा.) दुपारी साधारण अेक वाजता सॅन्टोरिनीत पोहचलो. पाऊस पडत होता. बरीच गर्दी होती, त्यात हातात बोर्ड धरून उभ्या असलेल्या आमच्या ड्रायव्हरला शोधणं जरा कठीण होतं. मोबाईल ऊंच करून किशोरने लांबूनच त्या गर्दीचा फोटो घेतला. त्या फोटोत आमच्या नावाची पाटी दिसताच आम्ही पटापट त्या दिशेने निघालो. पटकन गाडीत बसलो.  आजच थोडा पाऊस आहे. नन्तर व्हेदर छान आहे अशी ड्रायव्हरने दिलेली माहिती ऐकून बरं वाटलं.  सेन्टोरिनित आमचं हॉटेल होतं “डी सोल”, ह्या पंचतारांकित हॉटेलची रचना अेखाद्या रिसोर्ट  सारखी होती.  आमच्या रूमला सी व्ह्यू होता पण तो मिकोनोस इतका सुन्दर नव्हता. इथली खास गोष्ट होती रूम मधे असलेला झाकुझी.  सेन्टोरिनी  आणि त्याच्या आजूबाजूची बेटं ज्वालामुखीमुळे निर्माण झाली. सेन्टोरिनी हे लांबीत पसरलेलं डोंगराचं बेट आहे.  माथ्या पासून खाली उतरत येणारी घरं, इमारतींना क्वचित कुठे दुसरा रंग दिसतो पण तो सोडल्यास संपूर्ण शहर स्वच्छ पांढरं.  सॅन्टोरिनी बरंच मोठं आहे. सिनिक व्ह्यू , भरपूर दुकानं, रेस्टॉरेंट्स या गोष्टिमुळे सर्वात लोकप्रीय पण गर्दी असलेला भाग म्हणजे फिरा. फिराला पोचण्य

प्रवास वर्णनः ग्रीस 5

  ग्रीस (1 जून 2023, दिवस पाचवा) नाश्ता आटपून बाहेर पडलो पुन्हा अेकदा त्या पवनचक्क्या पाहिल्या, चर्चला गेलो.  बारा वाजण्याच्या आसपास आर्किओलॉजिकल साइट पहाण्यासाठी छोट्या फेरी बोटची टूर घेतली. अेका बेटावर उतरलो.  कडक ऊन होतं पण प्राचीन काळातील कलात्मकता, समृध्दीच्या साक्षिदार असलेले ते भग्न अवशेष पाहतांना हरवून गेलो. मला आपल्या हम्पीची आठवण आली. ही टूर साधारण दोन अडीच तासाची आहे. तीन वाजता आमची परत यायची बोट होती. मी बहुतेक वेळा मोबाईल मधे अलार्म लाऊन ठेवते. तो वाजायच्या  आधीच आम्ही परत आलो. आमच्या बोटीची वाट पहात बसलो. अेक बोट रिकामी झाली लोकं चढली पण आम्ही ज्या बोटीने आलो त्या बोटीवर जे नाव होतं ते त्यावर नव्हतं. तेव्हढ्यात वॉकीटॉकी घेतलेली अेक अगदी गोड मुलगी दिसली. तिच्याकडे पाहून अेक जुनं गाणं आठवलं, “ती पाहताच बाला कलिजा खलास झाला!”  तेवढ्यात तिने विचारलं “ वेतिंग फ़ॉर बोट? बी फास्त, द अदर विल कम आफ्तर थरी अवर्स”.  आम्ही लगबगीने बोटीकडे गेलो आणि बचावलो.  नावं आणि प्रकार वेगळे असले तरी त्या सर्व बोटी अेकाच कंपनीच्या होत्या. ही सुटली असती तर दुसरी थेट सहा वाजता होती. आम्ही चढलो आणि ल

प्रवास वर्णनः ग्रीस 4

 ग्रीस (31 मे 2023, दिवस चौथा) दुस-या दिवशी मी आमच्या रूम मधून सूर्योदय पहाण्यासाठी लवकर उठले. पण आकाश थोडं ढहाळलेलं वाटलं. चहा पिऊन जरा चक्कर मारायला बाहेर पडलो. हॉटेलच्या बाहेर आलो आणि समोर सूर्योदय होतं होता. ही खरी देवाजीची कृपा.  उगवतीच्या त्या कोवळ्या उन्हात मी फुलांचे नानाविध फोटो काढले. फ़ेसबुकवर अपलोड केले आणि लिहिलं  “देवाजीचं देणं !”  नाश्ता आटपून बाहेर पडलो. मिकोनोसच्या प्रसिध्द चर्चला गेलो. समुद्राच्या कडेने फिरत अेका बाकावर निवांत बसलो.  हवा सुन्दर होती ऊन मात्र लागत होतं. सेव्हन लक्सने सजेस्ट केलेलं हॉटेल शोधत निघालो. गुगल मॅप झिंदाबाद! तिथे पोहचून मात्र थोडे नाराज झालो कारण मेन्यू फारच लिमिटेड होता. दोन सॅन्डविच आणि सॅलड खाल्लं. महाग वाटलं पण कॉलिटी उत्तम असल्याने पेट आणि दिलं दोनों ख़ुश. आमचं हॉटेल त्या रेस्टोरेन्ट पासून जवळ असल्याने चालत हॉटलला आलो. थोडा आराम करून पूल साइडला जाऊन बसलो. हातात वाईनचे ग्लास आणि नजरे समोर साकारत असलेली मावळतीची क्षणा क्षणाला बदलणारी सुन्दर कलाकृती! चारुलता काळे