पोस्ट्स

टर्की

 टर्की १ अनेकदा अनेक देशांचा प्रवास झाला पण टर्कीला जाणं  मात्र  झालं नव्हतं. अमेरिकेला जाता येताना तसंच दोन वर्षांपूर्वी ग्रीस फिरून आलो तेंव्हा, टर्किश एअरवेजने प्रवास केल्याने, ब्रेक जर्नी ह्या स्वरुपात इस्तांबुल एअरपोर्ट पाहिलं होतं. ब्रेव्ह अॅन्ड ब्यूटिफुल सारख्या टरकिश सीरियल्स मधून झालेलं टर्कीचं विलोभनीय दर्शन मनाला सुखावून जायचं आणि टर्कीला जायलाच हवं हा विचार पुन्हा पुन्हा यायचा.  काश्मीर मधील आतंक आणि मग ऑपरेशन सिंदूर. टर्कीच्या पाकिस्तान समर्थना विषयीच्या बातम्या यामुळे मात्र आम्ही तिथे जाण्याचा विचार सोडून दिला होता. मधे काही काळ गेला शाल्मली, तेजस आमची लेक आणि जावई यांच्या बरोबरील गप्पांमधून टर्कीला जायला हवं असं अनेकदा म्हटलं गेलं आणि मग ते अमेरिकेतून आणि आम्ही भारतातून टर्कीला जायचं  नक्की झालं.  कोवीड पूर्वी आम्ही चौघं असेच स्पेनला एकत्र फिरायला गेलो होतो. तेंव्हा प्रवासाचं सर्व प्लॅनिंग तेजसने केलं होतं. यावेळी आम्ही 7लक्स हॉलिडेजवर ही जबाबदारी सोपवली. ह्या ट्रॅव्हल कंपनी बरोबरचा आमचा म्हणजेच माझा नवरा दिगंबर ऊर्फ किशोर आणि मी, अनुभव फारच ...

पार्किन्सन-अल्झायमर

 पार्किन्सन-अल्झायमर  वक्ता- डॉ. शिरीष बर्वे शनिवार दिनांक २५/७/२०२६ या दिवशी एका  मायक्रोसॉफ्ट टीम मीटच्या (मोबाइल मिटिंग) माध्यमातून डॉ. शिरीष बर्वे या शास्त्रज्ञाचे प्रेझेंटेशन पहाता आलं. अमेरिकेच्या  विविध भागातून तसेच भारतातून काही लोक या ऑनलाइन मीट मधे सहभागी झाले होते.  डॉ. शिरीष बर्वे हे केन्टकी, अमेरिका येथील University of Louisville मधील एक प्रसिद्ध प्राध्यापक आणि Norton Healthcare मधील मुख्य संशोधन वैज्ञानिक (Chief Research Scientist) आहेत. ते गट-ब्रेन कनेक्शन (gut-brain axis) आणि मायक्रोबायोम संशोधनातील आंतरराष्ट्रीय तज्ञ आहेत. नॉरटन न्यूरोसाइंस इन्स्टिट्यूट मधे  ते मुख्य संशोधन वैज्ञानिक, ह्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. पार्किन्सन, अल्झायमर आणि मज्जासंस्थेचे आजार हे डॉ शिरीष बर्वे यांचं संशोधन क्षेत्र आहे.  पार्किन्सन आणि अल्झायमर या दोन आजारां विषयीची साधारण माहिती अशीः    पार्किन्सन रोग हा मेंदूचा एक गंभीर विकार आहे, ज्यामुळे शरीराच्या हालचालींवर नियंत्रण रहात नाही.  हात-पाय थरथरणे, स्नायू कडक होणे, हालचाली मंदावणे आणि...

विजया मेहता

विजया मेहता   “विजया मेहता यांचे ३० जून २०२६ रोजी निधन झाले.” ही बातमी ऐकली, वाचली आणि पाहिली सुध्दा. मधे काही दिवस गेले, का कशी माहित नाही, आज पुन्हा विजया बाईंची आठवण आली. “आपणही काही लिहावं का त्यांच्या बद्दल!” मनात आलं आणि लिहीत गेले. हा लेख लिहितांना निधन झालंय पण ज्या व्यक्ती अजरामर कतृत्व गाजवून गेल्या किंवा ज्या मनाच्या जवळ आहेत त्यांच्या नावाच्या आधी मला ‘स्वर्गीय’ हा शब्द लिहावा असं वाटलं नाही म्हणून मी तसं    लिहिलं नाही.  “अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका तसेच जाणकार अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचं ‘झिम्मा’ नावाचं आत्मचरित्र ज्यातून उलगडत गेलेली रंगभूमीची गोष्ट/ माहिती, रसिक वाचकांना माहीत आहे. बाईं बद्दल इतकं लिहिलं गेलंय, बोललं गेलंय मग मी नवीन काय लिहिणार!” असा विचार मनात आला आणि तरिही त्यांच्या बद्दल लिहावसं वाटलं कारण मी त्यांना भेटले होते. हो मी बाईंना भेटले होते!  मी IWEP म्हणजेच इन्टरनॅशनल वर्क अॅन्ड इक्सपीरिअन्स प्रोग्रॅम या श्रेणीच्या ब्रिटिश व्हिसा संदर्भ...

Norway photos

  https://photos.app.goo.gl/iEMd9UPWr3Wkxs9n9

मुलाखत अरविंद प्रभू

 मुलाखत अरविंद प्रभू https://youtu.be/4ZSWla5k184?si=0Jjvjs1JacHnkfSU
 अंबरीश मिश्र  १. अक्षरांचे देणे प्रस्तुत ‘अनौपचारिक अंबरीश मिश्र!’ रविवार दि. १ फेब्रुवारी २०२५, रोजी, अक्षरांचे देणे प्रस्तुत ‘अनौपचारिक अंबरीश मिश्र!’ हा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाचा परिचय करून देणारं, ‘जुनी हिंदी चित्रपट गीते आपल्याला अजुनही भुरळ का घालतात?या चिरंतन प्रश्नाचा, गीतांच्या वैशिष्ट्यांसह घेतलेला अभ्यासपूर्ण मागोवा’ हे वाक्य यथार्थ करणारा हा कार्यक्रम कमालीचा रंगला.  “अल्ला तेरो नाम” या प्रार्थनेच्या ऑडियोने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रदीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे वक्ते अंबरीश मिश्र यांचं संस्थेच्यावतीने स्वागत तसेच सत्कार करण्यात आला. प्रदीप पाटील यांनी “अक्षरांचे देणे” या उपक्रमाची माहिती दिली. हा उपक्रम त्यानी २००७-२०११ या कालखंडात एकूण १७ उत्तमोत्तम कार्यक्रम करून यशस्वीपणे चालवला. काही कारणांनी त्यात खंड पडला. हा उपक्रम पुन्हा सुरू करावा आणि तो सुरू करताना अंबरीश मिश्र यांच्याच, प्रदीप पाटील यांना भावलेल्या कार्यक्रमाने तो सुरू करावा असं त्यांनी ठरवलं. प्रदीप पाटील हे साहित्यिक उ...