पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोष्ट इथे संपत नाही

  गोष्ट इथे संपत नाही रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५, दीनानाथ मंगेशकर नाट्य गृह, विले पार्ले येथे संजीवनी भिडे आणि अटल सेवा केंद्र प्रस्तुत गोष्ट इथे संपत नाही या शीर्षकाखाली, “आग्र्याहून सुटका”, हा सादरकर्ते सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांचा अत्यंत सुंदर लक्षवेधी कार्यक्रम पाहिला.  २०१७ पासून ते हा कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम २१६ वा होता. त्यांचे “गडकिल्ल्यांना भेटी” सारखे इतर उपक्रही आहेत.  सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांच्या या कार्यक्रमाची संहिता अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. सादरीकरण कमाल आहे. शाळेत इतिहासाच्या पुस्तकातली ही छोटीशी गोष्ट तशी माहितीची पण ती सादर करताना तिचे अनेक पैलू ते अधोरेखित करत विशद करतात. कार्यक्रम निवेदन आणि स्लाईडस् च्या माध्यमातून सादर केला गेला. प्रस्तावनेत सारंग मांडकेंनी आपला तसाच सारंग भोईरकर यांचा परिचय देऊन काही सूचना दिल्या. सारंग भोईरकरनी देवीची प्रार्थना आणि छत्रपति शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.   ओजस्वी आवाजात सारंग भोईरकर बोलत होते. सुभाषचंद्र बोस यांचे कलकत्याच्या घरातील बंदिवासातू...