पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रविंद्र पिंगे

  1. जेष्ठ साहित्यिक रविंद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त    कार्यक्रम- ‘स्मरणांजली’!  दि. १५ नोव्हेंबर २०२५, शनिवार, जेष्ठ साहित्यिक रविंद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्मरणांजली’ हा कार्यक्रम, पिंगे परिवाराने आयोजित केला होता. केशवराव घैसास सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रा वाघ ( रविंद्र पिंगे यांची कन्या) यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ती सांगण्याआधी    रविंद्र पिंगे यांच्या बद्दलचं प्रेम आदर व्यक्त करताना “बाबा गेलेले नाहीत, ते आमच्यात असतातच” असं म्हणून “नभाचा भरोसा जसा, तसा हा दिलासा तुझा, तरी एकदा सांग ना, आहेस ना…” ही काव्य पंक्ती उद्धृत करून त्यांनी    आपल्या भावना व्यक्त केल्या.  कार्यक्रमाची सुरुवात रविंद्र पिंगे यांचा साहित्य परिचय तसेच त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन प्रसंग/ क्षण यांचा संक्षिप्त परिचय करून देणा-या ए.व्ही. म्हणजेच ऑडिओ व्हिजुअलने,(ध्वनी चित्रफीत) झाली जी रविंद्र पिंगे यांचा मुलगा सांबप्रसाद पिंगे यांनी बनवलेली होती, संहिता होती चित्रा वाघ यांची...