पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पार्किन्सन-अल्झायमर

 पार्किन्सन-अल्झायमर  वक्ता- डॉ. शिरीष बर्वे शनिवार दिनांक २५/७/२०२६ या दिवशी एका  मायक्रोसॉफ्ट टीम मीटच्या (मोबाइल मिटिंग) माध्यमातून डॉ. शिरीष बर्वे या शास्त्रज्ञाचे प्रेझेंटेशन पहाता आलं. अमेरिकेच्या  विविध भागातून तसेच भारतातून काही लोक या ऑनलाइन मीट मधे सहभागी झाले होते.  डॉ. शिरीष बर्वे हे केन्टकी, अमेरिका येथील University of Louisville मधील एक प्रसिद्ध प्राध्यापक आणि Norton Healthcare मधील मुख्य संशोधन वैज्ञानिक (Chief Research Scientist) आहेत. ते गट-ब्रेन कनेक्शन (gut-brain axis) आणि मायक्रोबायोम संशोधनातील आंतरराष्ट्रीय तज्ञ आहेत. नॉरटन न्यूरोसाइंस इन्स्टिट्यूट मधे  ते मुख्य संशोधन वैज्ञानिक, ह्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. पार्किन्सन, अल्झायमर आणि मज्जासंस्थेचे आजार हे डॉ शिरीष बर्वे यांचं संशोधन क्षेत्र आहे.  पार्किन्सन आणि अल्झायमर या दोन आजारां विषयीची साधारण माहिती अशीः    पार्किन्सन रोग हा मेंदूचा एक गंभीर विकार आहे, ज्यामुळे शरीराच्या हालचालींवर नियंत्रण रहात नाही.  हात-पाय थरथरणे, स्नायू कडक होणे, हालचाली मंदावणे आणि...

विजया मेहता

विजया मेहता   “विजया मेहता यांचे ३० जून २०२६ रोजी निधन झाले.” ही बातमी ऐकली, वाचली आणि पाहिली सुध्दा. मधे काही दिवस गेले, का कशी माहित नाही, आज पुन्हा विजया बाईंची आठवण आली. “आपणही काही लिहावं का त्यांच्या बद्दल!” मनात आलं आणि लिहीत गेले. हा लेख लिहितांना निधन झालंय पण ज्या व्यक्ती अजरामर कतृत्व गाजवून गेल्या किंवा ज्या मनाच्या जवळ आहेत त्यांच्या नावाच्या आधी मला ‘स्वर्गीय’ हा शब्द लिहावा असं वाटलं नाही म्हणून मी तसं    लिहिलं नाही.  “अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका तसेच जाणकार अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचं ‘झिम्मा’ नावाचं आत्मचरित्र ज्यातून उलगडत गेलेली रंगभूमीची गोष्ट/ माहिती, रसिक वाचकांना माहीत आहे. बाईं बद्दल इतकं लिहिलं गेलंय, बोललं गेलंय मग मी नवीन काय लिहिणार!” असा विचार मनात आला आणि तरिही त्यांच्या बद्दल लिहावसं वाटलं कारण मी त्यांना भेटले होते. हो मी बाईंना भेटले होते!  मी IWEP म्हणजेच इन्टरनॅशनल वर्क अॅन्ड इक्सपीरिअन्स प्रोग्रॅम या श्रेणीच्या ब्रिटिश व्हिसा संदर्भ...