प्रवास वर्णनः ग्रीस 2
ग्रीस (29 मे 2023, दुसरा दिवस.) आमची दिवसभराची टूर होती. अथेन्सहून निघून आम्ही हायड्रा, पोरोस आणि अेजिना या बेटांवर जाणार होतो. ही टूर कॉसमॉसची होती. सकाळी सव्वा सातला आमचा पिकअप असल्याने झटपट ब्रेकफास्ट करून निघालो. जेट्टीला पोहोचलो, चार मजल्याची शानदार बोट पाहून ख़ुश झालो. ती ब-यापैकी भरली आणि वेळेत निघालो. बोटीवर जागा पकडण्यासाठी थोडी धावपळ झाली पण सर्वजण कुठेना कुठे आरामात बसू शकले. जागा मिळाल्यावर पर्स, हॅटस्, कॅप्स, बॅग्ज असं सामान बसण्याच्या जागेवर ठेऊन सर्व फोटो काढण्यासाठी इकडे तिकडे फिरत होते. रेस्टॉरंट मधून बसल्या जागी खाद्य पदार्थ दिले जात होते. ऑर्डर देताना माझं तोडकं मोडकं स्पॅनिश कामात आलं. गायडेड टूरचे निरनिराळे ऑपशन्स होते. किशोरने गायडेड टूर्सचा सर्वसमावेशक असा ऑप्शन घेतला. पहिलं बेट होतं हायड्रा. हायड्राला इद्रिस असंही म्हणतात. उच्चभ्रू, प्रसिध्द अमीर लोकांच, हॉलीवुड सेलिब्रिटीज़चं आवडतं ठिकाण. अनेकांच्या इथे प्रॉपर्टीज़ आहेत. इथे मोठं हॉस्पिटल नाही. हायड्रातं अनेक चर्च आहेत त्यातलं सर्वात जुनं, प्रसिध्द चर्च पाहिलं. गाइडने त्याबद्दल माहिती दिल...