लेखः ओशो भाग ३
ओशो इन्टरनॅशनल म्यूझिक फेस्टिव्हल अेक अनुभव! भाग ३ ओशो नादब्रह्म मेडिटेशन पहिल्या दिवशी म्हणजे ११ ऑगस्टला दुपारी २ः४५ ते ३ः४५ या वेळात ओशो नादब्रह्म मेडिटेशन करण्यासाठी आम्ही ओशो ऑडिटोरियमला पोचलो. रांगेत उभे राहून प्रवेश घेतला. मेडिटेशनच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जातात. ऑडिटोरियम मधे मेडिटेशनसाठीच्या खुर्च्या असतात. या खुर्च्यात बसलं की जमिनीवर जाड बैठक/सतरंजी घालून बसल्या सारखं बसता येतं. या मेडिटेशन खुर्चीला टेकायला पाठ असते. ध्यान करतांना पाय लांब करूनही बसता येतं. ज्यांना खाली बसायचं नसेल त्यांच्यासाठी खुर्च्या असतात. मेडिटेशनला येणा-याने मेडिटेशन चेअर घेऊन बसायचे आणी मेडिटेशन झाल्यावर ती चेअर पुन्हा जिथून घेतली तिथे ठेवायची. नादब्रह्म ध्यान करताना भुंग्यासारखा गुणगुणायचा आवाज करायचा असतो. त्याच बरोबर हातांना फिरवत आपल्या आतील संघर्षरत गोष्टींना अेका लयीत आणायचे आहे. आपले मन आणी शरीर अेका लयीत आलं हे साक्षिभावाने पहायचं आहे. अेका आनन्दाची अनुभूती अनुभवायची आहे. नादब्रह्म मेडिटेशन अेका विशिष्ट संगिताच्या साथीनं केलं जातं या अेका तासाच्या ध्यानाचे तीन भाग आहे...