लेखः ओशो म्यूझिक फ़ेस्टिवल

ओशो इन्टरनॅशनल म्यूझिक फेस्टिव्हल अेक अनुभव!


भाग 


ओशो इन्टरनॅशनल मेडिटेशन रिसोर्ट (OIMR) हे पुण्यातील कोरेगाव पार्क या निसर्गरम्य परिसरात आहे ओशो तीर्थ ही मेडिटेशन सेन्टर पासूनजवळच असलेली हिरवी गार बाग चालयला जाणा-यां इतकीच प्रेमी युगुलांसाठी निवांत आडोश्याची जागा आहे हे तिथे गेल्यावर लक्षात आलंइथे ओशोंचा बसलेला अेक अत्यंत सुन्दर असा पुतळा आहेओशो तीर्थ सकाळी सहा ते नऊ आणी संध्याकाळी तीन ते सहा या वेळात उघडंअसतंओशो मेडिटेशन सेन्टर आणी ओशो तीर्थ असा सर्व मिळून १६ अेकरचा विस्तिर्ण परिसर गर्द झाडीने नटलेला आहे


प्रवेशद्वारावर आमचं रजिस्ट्रेशन प्रोसिजर पूर्ण करूनपरचेसिंग कुपन्स घेऊन आम्ही मेडिटेशन सेंटरच्या आतल्या भागात प्रवेश केलाआम्हालामहोत्सवाच्या काळात होणा-या कार्यक्रमांची माहिती पत्रिका तसेच निरनिराळ्या महत्वाच्या मेडिटेशनची माहिती देणारी पुस्तिका देण्यात आलीजी इंग्रजी तसेच हिंदी भाषेत उपलब्ध होतीआमचं सामान आमच्या रूमवर जाणार होतंआत आल्यावर अेका स्वयंसेविकेने आम्हाला सेंटरचेनियम आणी आवश्यक माहिती देण्यासाठी 

राधा हॉल’ या ठिकाणी नेलं


कुठल्या वेळात मरून रोब वापरायचापांढरा रोब कधी वापरायचा हे सांगितलं गेलंओशो ऑडिटोरियम आणि ओशो चुआंग झू (Chuang tzu) या मेडिटेशनच्या ठिकाणीसायलेंट मेडिटेशनच्या काळातकसलाही म्हणजे अगदी बारिकसा आवाजही चालत नाही हे सांगण्यात आलंखोकणेशिंकणे किंबहुना अगदी हळू आवाजात खाकरण्यावर सुध्दा बंदी आहेही सूचना  पाळणा-याला तिथून बाहेर काढलं जाईल असंस्पष्ट करण्यात आलंमेडिटेशन सेशनमधेच सोडूनकुणी बाहेर गेल्यास त्या व्यक्तीला पुन्हा त्या सेशनमधे सामील होता येत नाहीहे हीसांगण्यात आलंमोबाइल वापरावरही बंदी आहेतुमचा मोबाइल गेट वरतीच जमा केला जातो.


सर्व सूचनांच महत्व लक्षात घेऊन आम्ही तिथून निघालोआमच्या रूमवर आलोमरून रोब घातला आणी बाहेर पडलो


ओशो ऑडिटोरियम 

ओशो मेडिटेशन सेन्टर मधील ओशो ऑडिटोरियम हा संपूर्ण वातानुकूलित हॉल आहेकमालीचा स्वच्छउत्कृष्ट ध्वनीयोजना असलेला साधारण१५००० स्क्वेअर फिटचाअेकाच वेळी २००० माणसे सामावू शकतील असा हा हॉल मनात भरतोह्या ऑडिटोरियम मधे जाण्यासाठी जी पायवाटआहे त्याच्या दोन्ही बाजूला संथ पाणी आहेरात्री इथे लायटिंग केले जातेमरून आणी पांढरे रोब घालून त्या वाटेवरून जाणा-या लोकांचे त्यातपडणारे प्रतिबिंब आणी सभोवतीची हिरवीगार झाडं हे दृश्य मनमोहक असतंया ऑडिटोरियम मधेडायनॅमिक मेडिटेशन आणी ओशो सांध्यसभा ह्या दोन गोष्टी तसेच इतर मुख्य मेडिटेशन होतातप्रत्येक वेळी आत जाताना मेटल डिटेक्टरने तपासणी करूनच आत सोडले जाते


बुध्दा ग्रोव्ह (Buddha Grove)

ही अेखाद्या स्टेज सारखी खुली जागा आहेइथे ओशो प्रवचन देत असतयोगाटाइ ची (Tai Chi), ची गॉंग (Chi Gong), गोल गिरक्या घेतनाचणे (Whirling), मुक्तपणाने नाचून आनन्द साजरा करणे गोष्टी इथे होतातकुणी इथे डोळे बंद करून अथवा उघडे ठेऊन शांत झोपलेलेदिसतातकुणी गप्पा मारतात तर कुणी पुस्तक वाचतातयाच्या बाजूने चालण्यासाठी सुन्दर वाट आहेहिरवी गार झाडी आहेया ठीकाणीसाधारण १००० माणसे सामावली जाऊ शकतातबुध्दा ग्रोव्ह ही जागा तरुणाई बरोबरच मनाने तरूण असलेल्या प्रत्येकाच्या आवडीचं ठिकाण!


चुआंग तुझ ( Chuang Tzu) 

 

ही जागा म्हणजे ओशोंच निवास स्थान, त्यांच्या अस्थी इथे समाधी रूपात आहेत. त्याचा कालखंड लिहून लिहिलेले आहे “ या काळात ओशोंनी पृथ्वीला भेट दिली”. इथे सायलेंट मेडिटेशन होतात. कधी कधी या मेडिटेशनला लाइव्ह संगिताची साथ असते. साधारण ३०० माणसं अेका वेळी बसू शकतील अशी ही जागा उच्च दर्जाचा मार्बल, ग्रेनाइट तसेच हॉलच्या मध्यभागी अतिशय भव्य, सुन्दर काचेच्या झुंबराने सुशोभित आहे. प्रवेश द्वारातच ओशोंची अेक रॉल्सरॉयस उभी आहे. आतील संपूर्ण भागात जमिन स्वच्छ पांढ-या रंगाच्या कापडात झाकलेली असते. ओशोंच्या प्रचंड वाचनाची साक्ष देणारी हजारो पुस्तकं त्यांची झाकलेली खुर्ची हे सर्व पाहून स्तिमित व्हायला होतं. 


अेम व्ही प्लाझा

इथे वेगवेगळे कार्यक्रम होतात. कार्यक्रमाच्या स्वरुपा प्रमाणे परफॉर्मर्ससाठीचं स्टेज, म्यूझिकल इन्स्ट्रुमेंटस, प्रकाश योजना केली जाते. समोर तसेच आजुबाजूला बसून, उभे राहून लोक कार्यक्रमाचा आनन्द घेतात. मॉनसून फ़ेस्टिवलों सर्व कार्यक्रम इथेच झाले. शिट्ट्या वाजवून किंवा सभ्यतेची सीमा ओलांडून प्रतिक्रिया/ प्रतिसाद न देण्याची समज कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच दिली जाते. त्याला न जुमानता जर कुणी लागलं तर त्या व्यक्तीला तिथून बाहेर काढलं जातं.


या प्लाझाच्या समोरच कॅफेटेरिया आहे. जेंव्हा मेन कॅन्टीन बंद होतं तेंव्हा इथे स्नॅक्स मिळतात. कॅन्टीनला नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण मिळतं. इथल्या खाद्य पदार्थांची किंमत नक्कीच

ब-यापैकी महाग आहे. सोय आणी स्वच्छता म्हणून लोक इथे खातात.  


कॅन्टीनच्या मागच्या परिसरात बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, स्वीमिंग पूल आणी चालण्यासाठी फरशी बसवलेली चांगली पायवाट आहे. कोवीड काळा पासून हा भाग वापरात नाही पण आम्ही दोघं जेवणा नन्तर इथे चालायचो. गर्द झाडी असल्याने बरेच लोक इथे निवांत बसतात, गप्पा मारतात, वाचत बसतात.


राधा हॉल

ह्या हॉलमधे ओशोंचे ऑडिओ टॉक्स होतात.


ओशो मेडिटेशन सेन्टरमधे ओशोंचे साहित्य तसेच सीडीजची विक्री करणारे अेक दालन आहे, तसेच ओशोंनी काढलेल्या मॉडर्न आर्ट चित्रांचे अेक दालन आहे. 


ओशो इन्टरनॅशनल सेन्टर ही जागा विविध प्रकारच्या वनश्रीने नटलेली असल्याने इथे मोर, पोपट, फुलपाखरे दिसतात. नानाविध पक्षांचा आवाज कानावर पडत रहातो. 

———————-

चारुलता काळे









 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चित्र कविता

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1