चित्र कविता
श्वासही अवघड झाले. केस मोकळे वा-यावरती, उदास हा चेहरा, छज्ज्या वरती अशी एकटी, नाही कुणी आधारा, काय कुणी ग दुखविले तुला, जगणे नकोच केले मरणा मधुनी अर्थ शोधिशी, श्वासही अवघड झाले..... चारूलता काळे ————————————————- मौतिक माळ कोळी कुणी हुशार, जाळे विणोनी जाई, पाहून कलाकारी, तो मेघ खुळा होई. हलकेच करी वर्षा,तो सहज कौतुकाची थबकून थेंब गुंफी, ती माळ मौतिकाची. वाकून जरा पाही, उन कोवळे उगाच, रत्ने बनून मोती, करती मजेत नाच. झाली निसर्ग जादू, डोळ्यात साठवावी, मनते उदास होता, अवचीत आठवावी. चारूलता काळे ————————————————- जाळे पाहिले मी अचानक, अेका कोळियाचे जाळे आणी मनामधे माझ्या, किती उठली वादळे… त्या कोळियाच्या जागी, मी मला कल्पियले, वेड्या विचाराने अेका, मन सैरभैर झाले. मी होतो इटुकला, अंगणात खेळ रंगे, माझी बडबड मोठी, किती ज्ञान मी ते सांगे! कुणी करी कुरबूर, कुणी धरी कधी कान, कुणी रागाने बोलले, कुणी पोट तीडकीनं. तो कोळी अेकटाच, मला होती नाती गोती, मी माझे काय केले, प्रश्न त्यांना सताविती. लटकलो मी ...