काव्यः माझ्या कविता 1

 माझ्या कविता 1

—————————————

सहज सुचलेलं

————————


नाही मनात आस माझ्या,

       ज्याने त्याने द्यावा मान,

तू ओळख दिलीस,

       आणी मन भरून आल.....


चारुलता काळे

——————————-


कुणी खूप प्रेम दिल,

       कुणी केला उपहास,

खर काय, खोट काय,

       माझ्या मनाचे केवळ भास.


चारुलता काळे

———————————


कळतय मला, तुमच्या साठी,

       माझ मोल नाही काही,

मी मात्र तुमच मोल,

       मनोमन जपत आहे.


चारुलता काळे

———————————


दिवस जातो,  खपताना,

       रात्र पुढे सरकत नाही...

आयुष्य मात्र सरून गेल,

        माझी ओंजळ रिती ठेऊन.


चारुलता काळे

————————————


हसत मुखाने उठायच,

       रोज ठरवून राहून जाते.

आता हसेन मग हसेन,

       म्हणता म्हणता रात्र होते.


चारुलता काळे

———————————-


जगण्या साठी रोज मरताना,

       जगायचच कस राहून गेलं

हातात अलगद येता येता,

       फुलपाखरू दूर उडून गेलं


चारुलता काळे

———————————

असूनही तुझ नसण,

आणी तस नसतानाही,

ते तुझ असण.....


तू होतास, तू नाहीस,

तरिही तू आहेस,

इथे, तिथे आणी जिथे तिथे....


चारूलता काळे


————————————————-


Sky Above-Earth Below-Peace Within!


निळे आकाश छताला,

काळ्या मातीचे अंगण

मधे नीरव शांतता,

तिला दोघांचे कोंदण.


चारुलता काळे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चित्र कविता

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड