आरसा
१. आरसा लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या, माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेच्या, विलेपार्ल्याचा आद्य सार्वजनिक गणेशोत्सव (वर्ष १०६ वे), या गणेशोत्सव कार्यक्रमात शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी, संस्थेच्या पु. ल. देशपांडे सभागृहात. मंगला खाडिलकर यांचा ‘आरसा’ हा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पोहोचायला मला थोडासा उशीर झाला होता. प्रस्ताविक तसेच मंगला जींचं स्वागत सत्कार संपून प्रसन्न वदना, मंगला जी व्यासपिठावर उभ्या होत्या. मला जिथे जी जागा मिळाली तिथे मी बसले. ज्यांचं बोलणं नेहमीच ऐकावसं वाटतं अशा मंगला जींनी बोलायला सुरुवात केली. सर्व प्रथम त्यांनी लोकमान्य सेवा संघ या संस्थेची महती सांगत माझ्या सारखे सर्वच कलाकार अशा संस्थेत कार्यक्रम करता आला की तो त्यांचा सन्मान समजतात. अशा संस्थाचे ते ऋणी असतात असं म्हणत लोकमान्य सेवा संघा बद्दलची आपुलकी व्यक्त केली. आपल्या ‘आरसा’ या कार्यक्रमा बद्दल त्या म्हणाल्या की मी काही वर्षांपूर्वी हा कार्यक्रम करणं बंद करून दुसरे कार्यक्रम करू लागले. पण गेल्या काही वर्षात पुन्हा या कार्यक्रमा बद्द...