पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चित्रपती व्ही. शांताराम

  चित्रपती व्ही. शांताराम. लोकमान्य सेवा संघ, पारले, या संस्थेच्या, सी. म. जोशी दिलासा केन्द्र    आयोजित, ‘चित्रपती व्ही. शांताराम.’ हा कार्यक्रम गुरुवार, २२ जानेवारी २०२६, रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची संकल्पना, संकलन, संहिता होती वासंती गोखले यांची.    विशेष मार्गदर्शन होते डॉ. रश्मी फडणवीस यांचं. स्व. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जन्मदिनाच्या कार्यक्रमाला त्यांचे सुपुत्र सन्माननीय माजी शेरीफ किरणजी शांताराम, यांची उपस्थिती ही या कार्यक्रमाची विशेष उल्लेखनीय गोष्ट ठरली.   या दृकश्राव्य कार्यक्रमात मीरा पेंडसे यांनी    संगणक सहायक ही जबाबदीरी उत्तम पध्दतीने सांभाळली. डॉ. रश्मी फडणवीस, वासंती गोखले, आशा कुलकर्णी, प्रदीप प्रधान, मीरा पेंडसे ह्यांनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने अभिवाचन केलं.  स्मीता बोरकर, सीमा केळकर, वैजयंती थत्ते, विपुल रेवणकर आणि प्रज्ञा भटकळ यांनी सादर केलेल्या “लखलख चंदेरी” गाण्यावरील नृत्याच्या, नृत्य दिग्दर्शक होत्या मानसी आपटे. व्ही शांताराम यांच्या सिनेमातील विविध गाणी त्या गाण्यांच्या मूळ चाली आणि ब...

इंदिरा संतांवरील लेख प्रतिक्रिया

 ‘जळत्या चांदण्यांचा चिद्गंध- इंदिरा संत’ विपुलश्री दिवाळी अंकातील आशुतोष उकिडवे यांचा हा अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि संवेदनशील लेख वाचून जे समजलं, वाटलं ते लिहिण्याचा हा प्रयत्न. अनावधानाने काही चूक झाली असेल तर क्षमस्व 🙏 ‘राधा आणि गोकुळ जागं होण्याआधी वाजलेली मुरली ही फक्त माझ्यासाठी….’ ह्या अत्यानंदाने तनामनाला पाण्यात टाकून भान हरपलेली कुब्जा शब्दात साकारणारी इंदिरा संतांची कविता लेखाच्या सुरवातीला वाचली आणि लेख वाचण्यासाठी उत्सुक झाले.  ह्या लेखात साहित्यिक म्हणून इंदिरा संतांनी राष्ट्रवाद, वर्णव्यवस्था, स्त्रीमुक्ती, शृंगार आणि असे बरेच विषय सोडून एखादा अपवाद वगळता केलेलं व्यक्तिनिष्ठ किंबहुना आत्मनिष्ठ लिखाण, त्यांच्या कवितेतलं निसर्गाचं नेपथ्य किंवा सृष्टीच्या सृजनत्वाचा आणि संहाराचा सहज स्वीकार. साधेपणाने केलेली सुरुवात पण कविता जशी पुढे जाते तशी खोल मनातली खदखद, वेदना, संवेदना अचानक जाणवू लागते. हे असे उल्लेख करत, त्यांच्या वेगवेगळेपणाची तुम्ही जाणीव करून दिलीत. इतकी आत्मकेंद्रित असुनही संपूर्ण साहित्य जगतात आपली नोंद घ्यायला लावणारी किंबहुना नादी लावणारी कविता” हे...