चित्रपती व्ही. शांताराम

 


चित्रपती व्ही. शांताराम.

लोकमान्य सेवा संघ, पारले, या संस्थेच्या, सी. म. जोशी दिलासा केन्द्र  आयोजित, ‘चित्रपती व्ही. शांताराम.’ हा कार्यक्रम गुरुवार, २२ जानेवारी २०२६, रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची संकल्पना, संकलन, संहिता होती वासंती गोखले यांची.  विशेष मार्गदर्शन होते डॉ. रश्मी फडणवीस यांचं. स्व. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जन्मदिनाच्या कार्यक्रमाला त्यांचे सुपुत्र सन्माननीय माजी शेरीफ किरणजी शांताराम, यांची उपस्थिती ही या कार्यक्रमाची विशेष उल्लेखनीय गोष्ट ठरली. 


 या दृकश्राव्य कार्यक्रमात मीरा पेंडसे यांनी  संगणक सहायक ही जबाबदीरी उत्तम पध्दतीने सांभाळली.

डॉ. रश्मी फडणवीस, वासंती गोखले, आशा कुलकर्णी, प्रदीप प्रधान, मीरा पेंडसे ह्यांनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने अभिवाचन केलं. 


स्मीता बोरकर, सीमा केळकर, वैजयंती थत्ते, विपुल रेवणकर आणि प्रज्ञा भटकळ यांनी सादर केलेल्या “लखलख चंदेरी” गाण्यावरील नृत्याच्या, नृत्य दिग्दर्शक होत्या मानसी आपटे. व्ही शांताराम यांच्या सिनेमातील विविध गाणी त्या गाण्यांच्या मूळ चाली आणि बाज सांभाळून त्यांचं सादरीकरण कर,  माया कुलकर्णी, विद्या पेठे, प्रतिभा सराफ, वैशाली जोशी, हेमांगी राजनेकर, कांचन गुप्ते, प्रदीप प्रधान आणि मानसी आपटे या गायकांनी हा कार्यक्रम बहारदार बनवला


 व्ही शांताराम ह्यांच्या बद्दलची माहिती ऐकायला श्रोते उत्सुक होते. शांताराम राजाराम वणकुद्रे हे नाव  त्यांचे मावस भाऊ बाबुराव पेंढारकरांमुळे व्ही शांताराम का आणि कसं झालं. व्ही. शांताराम यांची स्वभाव वैशिष्ट्यं. त्यांचा जन्म, त्यांनी सांगितलेल्या बालपणच्या आठवणी. व्ही. शांताराम यांच्या मनात तरळणा-या आठवणी, सांगितल्या गेल्या. ज्या ऐकण्यात सर्व मग्न झाले होते. 


व्ही शांताराम यांचा फिल्म कंपनीत प्रवेश. व्ही. शांताराम यांचे आत्मकथन असलेले पुस्तक, त्यांची वाचनाची आवड. प्रभात नावाच्या चित्रपट निर्मिती करणा-या कंपनीची सुरुवात. कंपनीच्या ‘प्रभात’ या नावाबद्दलची माहिती. अशी माहिती देऊन जुलूम हा प्रभातचा अखेरचा मूकपट हे सांगून, व्ही. शांताराम यांची कौटुंबिक- माहिती दिली गेली. 


अयोध्येचा राजा सन १९३२, पहिला मराठी बोलपट. 

प्रभातच्या यशस्वी मराठी तसेच हिंदी चित्रपटांचा उल्लेख करत, चित्रपटांच्या कथानका विषय माहिती. सैरंध्री ब्लॅक ॲन्ड व्हाईट चित्रपटाची रंगीत चित्रफीत बनवली गेली त्यासाठी व्ही. शांताराम यांचा जर्मनी प्रवास. नवीन तंत्रज्ञानाची माहिती.महात्मा हे चित्रपटाचे नाव बदलून धर्मात्मा का ठेवावं  लागलं. अमर ज्योती स्त्री स्वातंत्र्यावर आधारित चित्रपट, तो व्हेनिस येथील चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. संत तुकाराम या चित्रपटाची तुफान लोकप्रियता आणि या चित्रपटाचे जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटाताला एक म्हणुन नावाजलं  जाणं, ही सर्व माहिती कमालीच्या सुंदर पध्दतीने  दिली गेली. 


चित्रपटातील प्रसंग, डायलॉग, नेपथ्य, चित्रिकरणातल्या विशेष गोष्टी ह्यातून अधोरेखित होणारा अर्थ. कुंकु चित्रपटातील शांता आपटे यांनी गायलेलं इंग्लिश गाणं, दादासाहेब फाळके आणि व्ही. शांताराम यांचा पत्रव्यवहार. फाळकेंना वृध्दापकाळात केलेली मदत. माणुस हा मराठी तसेच आदमी हा हिंदी चित्रपट. माणूस हा चित्रपट पाहून चार्ली चॅपलीन प्रभावित झाले होते आणि शांताराम ह्यांना भेटले होते. शेजारी हा चित्रपट हिंदू मुसलमान वैमनस्याच्या ज्वलंत विषयावर आधारित होता. अशी रोचक उद्बोधक माहिती पाहून ऐकून श्रोते अनेकदा टाळ्या वाजवून व्ही शांताराम यांच्या कर्तृत्वाला दाद देत होते. 


व्ही शांताराम यांनी प्रभात ही कंपनी सोडली पण ती सदैव त्यांच्या मनात राहिली. राजकमल कलामंदीर या संस्थेची सुरुवात. डॉ. कोटनीस की अमर कहानी. मराठी आणि हिदीत बनवला. या चित्रपटा दरम्यान जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबर व्ही. शांताराम ह्यांचा संवाद होत असे. नवरंग हा सर्वांगसुंदर चित्रपट. पिंजरा ह्या गाजलेल्या चित्रपटावर भाष्य करताना त्या चित्रपटावर, दोन इंग्रजी चित्रपटांचा प्रभाव होता हेही सांगितलं गेलं. 


व्ही शांताराम यांची १९४३ ते १९८३ या काळात सामाजिक चित्रपट करण्याची विशेष आवड. त्यांच्या चित्रपटांचे अप्रतिम संगीत, त्या गाण्यांची प्रचंड लोकप्रियता. हे सर्व सांगून व्ही. शांताराम यांच योगदान अधोरेखित केलं गेलं. व्ही. शांताराम ह्याची सत्यं शिवम सुंदरं ह्या त्रयीवर निष्ठा होती. त्यांच्या आचार, विचार, कर्तृत्वात ती स्पष्ट दिसते. 


‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ हे प्रार्थना गीत दिलासा सदस्यांना साथ देत किरण शांताराम गात आहेत आणि संपूर्ण सभागृह कमालीच्या तन्मयतेनं ते ऐकत भावूक झालं आहे, हा सोहळा शब्दांच्या पलीकडला…


प्रार्थना गीता नन्तर किरण शांताराम यांनी व्ही. शांताराम यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. बोलताना ते भावूक झाले होते. “ते माणूस म्हणून ग्रेट, वडील म्हणून अत्यंत कडक.” असं आपल्या वडिलां बद्दलचं त्यांचं वाक्य तसंच “माझ्या सामाजिक चित्रपटांमुळे एक जरी माणूस सुधारला तरी सार्थक झालं.” हे व्ही शांताराम यांच वाक्य विशेष लक्षात राहिलं. 


किरण शांताराम यांनी अगदी मनापासून कार्यक्रमाचं कौतुक केलं. त्यांचे आभार मानले. 


व्ही. शांताराम यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. १९८६ मधे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळणं हा त्यांचा आणि संपूर्ण सिनेसृष्टीचा सन्मान म्हणायला हवा. 


हा कार्यक्रम म्हणजे व्ही. शांताराम नावाच्या महान व्यक्तीच्या माध्यमातून ‘सत्यं शिवम सुंदरम!’ यांची अनुभूती होती. 


या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या बद्दल लिहिण्याचा माझा हा प्रयत्न. अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व 🙏


चारुलता काळे. 

9821806827

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

पार्ले कट्टा- श्री. अच्च्युत गोडबोले