प्रवास वर्णनः ग्रीस 4

 ग्रीस


(31 मे 2023, दिवस चौथा)


दुस-या दिवशी मी आमच्या रूम मधून सूर्योदय पहाण्यासाठी लवकर उठले. पण आकाश थोडं ढहाळलेलं वाटलं. चहा पिऊन जरा चक्कर मारायला बाहेर पडलो. हॉटेलच्या बाहेर आलो आणि समोर सूर्योदय होतं होता. ही खरी देवाजीची कृपा.  उगवतीच्या त्या कोवळ्या उन्हात मी फुलांचे नानाविध फोटो काढले. फ़ेसबुकवर अपलोड केले आणि लिहिलं  “देवाजीचं देणं !” 


नाश्ता आटपून बाहेर पडलो. मिकोनोसच्या प्रसिध्द चर्चला गेलो. समुद्राच्या कडेने फिरत अेका बाकावर निवांत बसलो.  हवा सुन्दर होती ऊन मात्र लागत होतं. सेव्हन लक्सने सजेस्ट केलेलं हॉटेल शोधत निघालो. गुगल मॅप झिंदाबाद! तिथे पोहचून मात्र थोडे नाराज झालो कारण मेन्यू फारच लिमिटेड होता. दोन सॅन्डविच आणि सॅलड खाल्लं. महाग वाटलं पण कॉलिटी उत्तम असल्याने पेट आणि दिलं दोनों ख़ुश. आमचं हॉटेल त्या रेस्टोरेन्ट पासून जवळ असल्याने चालत हॉटलला आलो. थोडा आराम करून पूल साइडला जाऊन बसलो. हातात वाईनचे ग्लास आणि नजरे समोर साकारत असलेली मावळतीची क्षणा क्षणाला बदलणारी सुन्दर कलाकृती!


चारुलता काळे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चित्र कविता

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1