प्रवास वर्णनः ग्रीस 8

 ग्रीस


(4 जून 2023, दिवस सातवा.)


सॅन्टोरिनीतला तिसरा दिवस. आज आमची सॅन्टोरिनी हायलाइटस् अशी पूर्ण दिवसाची बसची गाइडेड टूर होती.  बराच चढ चढून अेक मॉनेस्ट्री पहायला गेलो पण ती बंद होती. बीचवर गेलो तिथल्या रेस्टोरेन्टला जेवलो, चर्चेस पाहिली. 

सेन्टोरिनीत उत्कृष्ट वाईन्स बनतात. या टूरमधे आम्ही वाइन टेस्टिंग करायला अेका वायनरीत गेलो. किशोरला आणि मला त्यातली अेक वाईन प्रचंड आवडली जी आम्ही खरेदी केली. या टूरचं प्रमुख आकर्षण होतं ओइया ही जागा जिचा उच्चार आमचा गाईड ‘इया’ असा करत होता.  तिथला सूर्यास्त खास मानतात. फिरा प्रमाणेच ओइया मधे दुकानांच्या गल्ल्या आहेत. तिथल्या कॅसल मधून सूर्यास्त पहाण्यासाठी गर्दी होती. आम्ही ती टाळून अेका रेस्टोरेन्टच्या रूफ टॉपवरून तो पाहिला. पुन्हा त्याच निसर्ग जादूचा आनन्द!


चारुलता काळे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चित्र कविता

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1