प्रवास वर्णनः ग्रीस 9

 ग्रीस


(5 जून 2023 आठवा दिवस.)


आमची सकाळची साडे आठची फ्लाइट फक्त पाउण तासाने नऊ पंधराला अथेन्सला पोहचली. आधी उतरलो होतो त्याच ग्रॅन्ड हयातला बुकिंग होतं. चेकइन झालं. रूमच्या गॅलरीतून पुन्हा अेकदा तो रस्ता आणि दूरवर दिसणारी ॲक्रोपोलिसची इमारत दिसली. आमचं हॉप ऑन हॉप ऑफ या साइट सिइंग बसचं तिकीट होतं जे 5 आणि 6 असं दोन दिवस चालणार होतं. हॉटेलच्या बाहेरच बस थांबत होती. चहा पिऊन आम्ही बस पकडली आणि अॅक्रोपोलिसच्या स्टॉपला उतरलो. बराच चढ चढ़त आणि त्या चढावरील इतर प्राचीन इमारती पहात, माहिती वाचत मुख्य इमारती पर्यन्त पोचलो. ते स्थापत्य पाहून भारावून जायला होतं. त्या इमारतींच संरक्षण, जतन आणि जीर्णोद्धार हे काम चालू आहे. 


त्या वास्तू आणि तिथून दिसणारं खालचं अथेन्स शहर पहाण्यात हरवून गेलो. आकाशात मावळतीचे रंग गडद झाले आणि खाली उतरायला सुरवात केली. चालत अेका चौकात पोचलो. बरीच गर्दी होती. अेका ठिकाणी काही तरूण ड्रम वाजवत, गात नाचत होते तिथे थोडे रेंगाळलो. उशीर झाला होता म्हणून टॅक्सी करून हॉटेलला आलो. 


चारुलता काळे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चित्र कविता

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1