पार्ले सप्तसोपान
💐 ———— पार्ले सप्तसोपान जेष्ठ मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ ठाणे यांच्या सहयोगातून, मन चैतन्य फाउंडेशन संचालित, पार्ले सप्तसोपान, जेष्ठ नागरिक- मनमेंदू संवर्धन केन्द्राचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, पार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता. १६ सप्टेंबर २०२५ पासून विलेपार्ले येथे, “पार्ले सप्तसोपान” हा एक अभिनव उपक्रम सुरू होत आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभा निमित्त विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या व्यासंगी आणि प्रसन्नवदना, सुसंवादिनी मंगला खाडीलकर, यांच्याशी या उपक्रमाचे मार्गदर्शक, ज्येष्ठ मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, यांनी मनमोकळ्या गप्पा मारत वृध्दत्वाकडून आनंदी ज्येष्ठत्वाकडे जाण्याचा मंत्र सहजसुंदरतेने उलगडून दाखवला. मंगला जीं नी, डॉ. नाडकर्णींना विचारलं की वृध्दत्व आणि ज्येष्टत्व म्हणजे नक्की काय? त्याचं उत्तर देताना डॉक्टर म्हणाले की या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःला पुढील पाच प्रश्न विचारून मिळवावं. तुमचं शारिरिक...