सण, महिला सुरक्षितता व शहरी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर दक्षता समिती सदस्यांची कार्यशाळा

 



सण, महिला सुरक्षितता व शहरी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर दक्षता समिती सदस्यांची कार्यशाळा.


बुधवार, दि. १३ ऑगस्ट, २०२५ रोजी, विधानपरिषद उपसभापती कार्यालयाच्या वतीने, मुंबई पोलीस ठाण्याच्या दक्षता समिती सदस्यांच्या कार्यशाळेचे आयोजन, यशवंत चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे करण्यात आले. कार्यशाळेचे विषय होते सण, महिला सुरक्षितता व शहरातील आपत्ती व्यवस्थापन.


उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद कार्यालयामार्फत महिला सुरक्षितता, कौटुंबिक हिंसाचार संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, एकल महिला प्रश्न, महिला व बालकांवर अत्याचार प्रतिबंध अशा विविध बाबींवर वेळोवेळी उपक्रम घेण्यात येतात. 


कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मा. ना. डॉ. नीलम गो-हे. या कार्यक्रमाला सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मा. ना. ॲड. राहूल नार्वेकर उपस्थित होते.  मुंबई पोलीस आयुक्त श्री.देवेन भारती कार्यक्रमाला उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या अध्यक्ष, नीलम गो-हे यांनी प्रास्ताविकात आजच्या कार्यक्रमाचा उद्देश, महत्व सांगितलं. स्त्री भ्रूण हत्या. गर्भपातात मृत्यू, कोलंबी साफ करणा-या बायकांच्या हाताला इजा होणं ( ती होवू नये म्हणून नवं तंत्रज्ञान), स्त्रिया आणि मुलांचे शोषण. स्त्रियांनी सतर्क रहाणं, बोलणं, निरीक्षण करणं, समाज माध्यमांचा योग्य वापर, पोलिसां बरोबर कसं काम करावं याची माहिती. अशा अनेक गोष्टींचा संक्षिप्त आढावा घेऊन, उपस्थितांचं त्यांनी स्वागत केलं. 


सम्माननीय प्रमुख पाहुणे राहुल नार्वेकर यांनी आजचा हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे असं म्हणून तो आयोजित करण्यासाठी नीलम गो-हे यांच कौतुक केलं. महिला सर्वच क्षेत्रात यशस्वी आहेत असं म्हणून “दक्षता” हा त्यांचा नैसर्गिक गुण असतो हे मान्य करावंच लागेल असं सांगितलं. बदलत्या काळात गुन्ह्यांचं स्वरूप बदललं अफवा, सामाजिक समतोल बिघडवणे, सायबर तसेच ड्रोन ॲटॅक इ. गुन्हे घडतात. महिला त्यांच्या बुध्दिचातुर्याने ओळखणं, भावना समजून घेणं या गुणांमुळे एखाद्या गोष्टीची उकल करून सामंजस्याने प्रश्न सोडवू शकतात. असं म्हणत महिलां बद्दल आदर व्यक्त केला. 


कार्यक्रमात वक्ते होतेः

१.) मा. श्री. महेश नार्वेकर,

संचालक आपत्ती व्यवस्थापन, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.

विषय-आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कृती, महानगरपालिकेची जबाबदारी आणि नागरिकांचे अधिकार. 


आपत्ती म्हणजे काय, त्याची उदाहरणे, आपत्ती कोणाला सांगून येत नाही. घर घेताना बिल्डिंग अर्थक्वेक रेझिस्टंट आहे का याची माहिती, योग्य ती फायर फायटिंग सिस्टीम आहे ना? फॉल्स सीलिंग करू नये कारण त्यातील थर्माकोल हा आग पकडतो. सिक्युरिटी आणि सेफ्टी यात कशाला किती महत्व द्यायचं. सिक्युरिटी आणि सेफ्टी या एकत्र मिळत नाहीत. इलेक्ट्रिक ऑडिट महत्वाचे. आपत्ती आली की पहिले काही तास अतिमहत्वाचे.


Prime ministers ten point agenda on DRR. आपदा सखी बनू शकता. परेलला विनामुल्य शिकवलं जातं. 

————-

२.) मा. श्री. विवेक पानसरे, 

पोलीस उपायुक्त, अंमलबजावणी पोलीस आयुक्तालय, मुंबई. 

विषय- उत्सव कालावधीत महिला व बालक

सुरक्षितताः कायदे, संरक्षण यंत्रणा व समाजाचा सहभाग. 


महिलांकडे पहाण्याचा दृष्टिकोन त्यात बदल होतोय. महिलांना कायद्याचे संरक्षण, POSCO, Act 2012, 

महिलांच्या मुलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे, त्यासंबंधीची सतर्कता, विविध योजना, महत्वाच्या हेल्पलाईन. सामाजिक जबाबदारी म्हणून

जबाबदारीने वागा. 

मंडप मजबूत हवा तो बांधताना काळजी घ्या. मंडपाच्या जवळ पार्किंग नसावे, कार्यक्रमाच्या जागेवर पुरेसे सी.सी. टीव्ही. पुरेशी प्रकाश व्यवस्था, महिलांसाठी वेगळा प्रवेश आणि रांग, स्वयंसेवकांचे लक्ष, मुलांकडे पालकांचा मोबाईल नम्बर लिहिलेले ओळखपत्र ठेवणे…

—————-

३.) मा. श्री. सचीन गावडे. 

पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोधक पथक, पोलीस आयुक्तालय, मुंबई. 

विषय- स्फोटकांवर नियंत्रण व सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी. 


या आधी देशात जे बॉम्बस्फोट झाले त्यांचा उल्लेख करत. विविध प्रकारचे बॉम्ब, ते ठेवण्याच्या पध्तती. त्यांचे स्फोट कसे घडतात याची माहिती देऊन खबरदारी म्हणून नागरिकांनी काय करावे व करू नये याची माहिती देण्यात आली. 

बाम्ब सदृश गोष्टी पासून दूर जा. कुठल्याही परिस्थितीत हात लावू नका. तिची स्थिती, जागा बदलू नका, तिच्यावर पाणी टाकू नका, मोबाइल वापरू नका. फ्लॅश/ प्रकाश झोत टाकू नका. शक्य तितक्या लवकर पोलिसांना कळवा. 


हा कार्यक्रम फक्त निमंत्रित सदस्यांसाठी होता. पार्ले पोलिस स्टेशनच्या महिला दक्षता विभागाशी पार्ले नागरीक म्हणून मी संलग्न आसल्याने मला या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले होते. माझ्या प्रमाणेच श्रीमती वीणा भागवत, श्रीमती देवयानी अंबेकर तसेच श्रीमती लीना रेडकर या महिलांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याचे त्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. 


वक्यांनी भाषणा बरोबरच स्लाइडस् दाखवल्याने त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित झाले. 

संबंधित विषयासाठी संपर्क करण्याचे महत्वाचे मोबाईल नम्बर समजले. सामाजिक भान ठेऊन वागा. समाज माध्यमांचा बेजबाबदार वापर करू नका. अफवा, भीती, धार्मिक तसेच सामाजिक द्वेष पसरवून नका. ह्या गोष्टींचं महत्त्व लक्षात आलं 


या कार्यक्रमाला उपस्थित रहिल्याने मला अनेक नवीन गोष्टींची माहिती मिळाली. समाजासाठीची कर्तव्य भावना अधिक प्रबळ झाली. समविचारी महिलांना भेटण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटला. 


या कार्यशाळेला उपस्थित राहून  महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेण्याचा माझा हा प्रयत्न.  काही चूक झाली असल्यास क्षमस्व 🙏


चारुलता काळे 

9821806827




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1