भजन संध्या

 



देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, विलेपार्ले या संस्थेने श्रावण मासनिमित्त, अवधूत प्रासादिक भजन मंडळ प्रस्तुत, भजन संध्या.


रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, विलेपार्ले या संस्थेने श्रावण मासनिमित्त, अवधूत प्रासादिक भजन मंडळ प्रस्तुत, भजन संध्या ह्या पारंपरिक भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 


देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे कार्याध्यक्ष श्री विनय केकतपुरे यांनी अवधूत प्रासादिक भजन मंडळाचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. 


कार्यक्रमात अवधूत प्रासादिक भजन मंडळा बद्दलची महत्त्वाची माहिती देण्यात आली. अवधूत प्रासादिक भजन मंडळ (प.), याची स्थापना १९७८ मधे झाली. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थापना झाली तेंव्हापासून अखंडपणे मंडळाचा प्रत्येक गुरुवारी भजनाचा कार्यक्रम असतो. कोविड काळात ऑनलाइन स्वरुपात कार्यक्रम केले गेले. आत्तापर्यन्त एकूण २४०० कार्यक्रम आणि १२४० विशेष कार्यक्रम घेतले गेले. 


प्रासादीक भजन परंपरा जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी तसेच ती पुढच्या पिढीला सुपूर्त करण्यासाठी ह्या मंडळाचे यूट्यूब चॅनल आहे ज्यावर २४० भजने प्रसिद्ध केलेली आहेत. या यूट्यूब चॅललचे जवळपास एक लाख दर्शक आहेत. 


भजनाचे मुख्य गायक होते. श्री महेश घाणेकर, श्री. प्रकाश मेहेंदळे, श्री मोरेश्वर क-हाडकर आणि मंडळी. या मुख्य गायकांव्यतिरिक्त आणखी काही गायकांनीही भजनं सादर केली. हार्मोनियमची साथ, श्री महेश घाणेकर तसेच श्री विकास घाणेकर. तबला साथ, श्री. राजेंन्द्र कार्लेकर व श्री मंदार घाणेकर. झांज वाजवून तसेच कोरस गायनात सहभागी होत मंडळाच्या इतर सभासदांनी उत्तम साथ दिली. 


भजनात नमन, रूपाचा अभंग, गवळण, गोंधळ, गजर असे विविध प्रकार सादर झाले. शास्त्रीय संगिताची उत्तम जाण, लोकगीताचा ठसका, भक्तीची उत्कटता अशा अनेक गोष्टींची झलक असलेली भजनं मंत्रमुग्ध करणारी होती. 


——————

कार्यक्रमाचे सादरीकरणः

नमन

श्री. महेश घाणेकरः 

             पार्वतीच्या नंदना तू मोरया गजानना,

             रंगी नाचे देव मोरया. 

श्री. प्रकाश मेहेंदळेः कधी खाई तूप रोटी

श्री. चौकर: घटका गेली, पळे गेली

श्री. प्रसाद वेलणकरः झुलता है यतिराज 

श्री. नन्दू सोमणः धरिला पंढरीचा चोर.

श्री. मंदार घाणेकरः राम वदा, श्रीराम सदा

श्री. मोरेश्वर क-हाडकरः

               कान्होबा तुझी घोंगडी चागली रे

               कुणी घ्या ग सखे घ्या ग.

श्री. महेश घाणेकरः 

               आईचा अंबा बईचा गोंधळ.

                धन्य भाग सेवा का अवसर पाया


गजर- ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.

——————-


कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती तनुजा घोटिकर यांनी अवधूत प्रासादिक भजन मंडळाचे कौतुक करून त्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले. 


या कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. प्रसाद वेलणकर आणि सायली वेलणकर यांचे विशेष सहाय्य लाभले. 


बाहेर पावसाचीसंततधार आणि सभागृहात भक्तिरसाची.. “प्रासादिक भजन" म्हणजे, भक्तीचा आनंद आणि परमेश्वराचा कृपा (प्रसाद) मिळावा यासाठी गायले जाणारे भजन. यात भक्ती आणि श्रद्धेने देवाची स्तुती केली जाते. हे भजन म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक साधना आहे, ज्यामुळे मन शांत होते आणि आंतरिक आनंद मिळतो. आजचा हा कार्यक्रम अगदी असाच अनुभव देणारा होता. 


मी या कार्यक्रमाला उपस्थितहोते. कार्यक्रमा बद्दल लिहिताना कुणाचा उल्लेख राहिला असेल किंवा काही चूक झाली असेल तर क्षमस्व! 


चारुलता काळे.

🙏

९८२१८०६८२७

———-

                

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1