लेखः ओशो इन्टरनॅशनल सेन्टर मॉनसून म्यूझिक फ़ेस्टिवल

 ओशो इन्टरनॅशनल म्यूझिक फेस्टिव्हल अेक अनुभव!


भाग 


(ओशो इन्टरनॅशनल मेडिटेशन सेन्टर येथे आयोजित मॉनसून फ़ेस्टिवल 11 ऑगस्ट 2023 ते 16 ऑगस्ट 2023.)


ओशोअेक वादग्रस्त आध्यात्मिक गुरू!”, ही ओशोंची प्रतिमा माझ्या डोक्यात होतीप्रसार माध्यमे त्यांच्या बद्दल परस्पर विरोधी बातम्या देतअसत आणी अजुनही त्यांच्या आयुष्यावर आधारित अशा मालिकामाहितीपट बनत असतात


अेक टूरीस्ट डेस्टिनेशन म्हणुन मला या जागे विषयी जिज्ञासा होतीओशो म्यूझिक फ़ेस्टिवलला जायचं ठरवलं ते माझी माझ्याहून वयाने बरीचलहान असलेली आणी अनेक वर्ष माझ्या बरोबर जीम तसेच योगा करणारी माझी मैत्रीण मैत्री शहा हिच्यामुळेती गेली अनेक वर्ष तिथे जातअसतेयंदाचा कार्यक्रम ठरला आणी तिने ताबडतोब त्याची माहिती दिलीमहोत्सवाच्या चार महिने आधी आम्ही ऑन लाइन बुकिंग केलं


11 ते 15 असे तिथे राहून आम्ही 16 तारखेला परत मुंबईला आलोओशो गेस्टहाउसला रहिलोएसी रूम प्रतिदिन पाच हजारफ़ेस्टिवल प्रत्येकदिवसाचे हजारनाश्ता दोन्ही वेळचं जेवण यांची कुपन्स नऊ हजारप्रत्येकी दोन असे अेकूण चार गाउन्स ज्याची किंमत चार हजार सहाशे आणीमुंबई-पुणे-मुंबई टॅक्सी प्रवास असा सर्व मिळून दोघांचा खर्च साधारण पन्नास हजार झाला


मेन गेटवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश दिला जातोतुमची फोटो आयडी म्हणजेच आधार कार्ड कॉपीपॅन कार्ड कॉपीपासपोर्ट कॉपीद्यावी लागतेहे दिलं की तुमचा फोटो घेतला जातो आणि मग तुमचा विशिष्ट काळासाठीचा गेट पास बनतोओशो सेन्टरचे समोरासमोर दोनविभाग आहेतमधून अेक छोटा रस्ता जातोकुठल्याही विभागात प्रवेश करताना तुमचा गेट पास स्कॅन करावा लागतोतो केला की तुमचा फोटोसमोर दिसतो आणी मगच तुम्हाला प्रवेश मिळतो

पास नसेल तर प्रवेश मिळत नाहीहा पास बनतो तिथेच तुम्हाला जेवणचहा नाश्तारोब्सची खरेदी गोष्टींची कुपन्स खरेदी करावी लागताततुम्ही कुठलीही वस्तू विकत घेतलीत की त्या कुपनवरील त्या किमतीचे चौकोन खोडले जातातओशो सेन्टरची ही पध्दत अत्यंत काटेकोरपणेपाळली जातेकुठलाही अनोळखी माणूस प्रवेश करू शकत नाही आणी पैशांचा वापर नसल्याने त्यात भ्रष्टाचार नाही.


आम्ही ओशो गेस्ट हाउसचं बुकिंग केलं होतंओशो गेस्ट हाउसला साठ रुम्स आहेत आणी इथे राहिलं की ओशों सेन्टर मधील सर्व कार्यक्रमांनावेळेत उपस्थित रहाणं सोईच होतंह्या गेस्ट हाऊसचे कामकाज सोडेस्को ही कंपनी पहातेओशो सेन्टरच्या जवळील इतरही प्रॉपर्टीज़ ही कंपनीपहातेत्या सर्व मिळून त्याच्याकडे अेकूण दोनशे रूम्स आहेत


ओशो सेन्टरमधे दिवसा मरून रंगांचा लांब गाऊन घालणे सक्तीचे आहेरोज संध्याकाळी पावणे सात ते साडे आठ या वेळात पांढरा गाऊनघालणे सक्तीचे आहेह्या वेळात ओशो सांध्य सभेचं आयोजन असतंतेंव्हा पांढरा गाऊन घालून तुम्हाला ओशो ऑडिटोरियमला उपस्थितरहायचो असतंया सांध्य सभेच्या वेळात कुणिही इकडे तिकडे फिरू शकत नाहीजर सांध्य सभेला जायचं नसेल तर सेन्टरच्या बाहेर जायचंआणी साडे आठ नन्तर यायचं अथवा तुमचं वास्तव्य असेल त्या जागेतच रहायचंहा पांढरा गाऊन फक्त सांध्य सभेसाठीच वापरायचातो घालूनइतर जागी फिरायचं नाहीसभा संपली की रात्री कुठलेही कपडे घालू शकता


————————————————————-

चारुलता काळे

🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

प्रवास वर्णनः ग्रीस 2

लेखः ओशो भाग ३