कथाः “भिजणं”



भिजणं 


महिन्याचा दुसरा शुक्रवार ऑफीस सुटल आणी मी पुण्याला 

जाणारी ट्रेन पकडण्यासाठी घाईत निघाले . “हल्ली पावसाच काही सांगता येत नाहीमेला कधिही कोसळतो!” अवकाळी पावसाला शिव्या देतमी स्टेशन गाठल


स्टेशनवरची गर्दी नेहमीचिचमाझं प्रॉजेक्ट प्रेझेन्टेशन असल्याने ,पंजाबी ड्रेस  घातला मी आज साडी नेसलेलीओला प्लेटफ़ॉर्मत्यातदुष्काळात तेरावा म्हणतात नातशी माझी चप्पल तुटलीगाडी सुटण्याची शिट्टी ऐकली आणी लेडीज़ डब्ब्या पर्यन्त जाण अशक्य हे लक्षातयेऊन मी जो समोर दिसला त्या डब्यात चढले


अरे वाखिडकीची सीट चक्क रिकामी?” मला हायस वाटलपण तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं की पाऊस पडतोय आणी खिडकीची काचजरा फुटलेली आहेतुटकी चप्पल आणी भिजलेली साडी सावरत कुठे दुसरी जागा शोधू?” असा विचार करत मी थबकले तेवढ्यात गाडीहललीत्या झटक्याने मी बाजूच्या माणसावर पडता पडता स्वत:ला सावरतबसले अेकदाचीत्या माणसाला माझ्या धडपडण्याने त्रास झालाअसणार म्हणून मी सॉरी म्हटलं पण तो चक्क मान मागे टेकवून तोंडावर रुमाल टाकून झोपला होता


गाडीचा डब्बा अगदी डब्बाच होताडोक्यावरचे काही दिवे मंद तर काही चक्क बंदभिजलेली साडी आणी त्या मोडक्या खिडकीतून येणारा गारवारा पार गारठले होते मी.


मी गाडीत जरा स्थिरावलेआणी मोबाइल वाजलापलिकडून माधव “ कायआज गाडीत बसल्यावर फ़ोन नाही?” “अरेकरणारच होते” मीम्हटलतेवढ्यात रेंज गेलीमी फोन पर्समधे ठेवलामाधवचा माझी काळजी वाटून आलेला फ़ोन सुखाऊन गेला


माधवच्या आई वडिलांचा मुंबईत छोटासा फ्लेटवनरूम कीचनचाआम्ही चौघे आणी मग आमचा मुलगा निनाद झाल्यावर पाच जण तिथेचरहायचोपण सर्वांच्याच मनात अेका मोकळ्या घराच स्वप्न होतचआम्ही दोघेही काम करत होतोथोड क़र्ज़ घेतल आणी पुण्यात गावा पासूनजरासा लांब असा स्वत:चा छोटा बंगला बांधलाअधून मधून जायचो तिथेछोट्याशा आजाराच निमित्त आणी माधवचे बाबा वारलेपाठोपाठआई पण गेल्यात्या नन्तर काही वर्षांनी निनाद अमेरिकेत शिक्षणासाठी गेलाआता मुंबईपेक्षा आम्हालाही पुण्याचा निवांतपणा हवाहवासावाटायला लागला.


रिटायर्ड झाल्यावर माधवने पुण्यात रहायच आणी माझं प्रमोशन ड्यू असल्यानेमी निदान अेक वर्ष तरी मुंबई  सोडतासेकंड आणी फोर्थविकअेंडची शनीवाररविवारची सुट्टी पकडून पुण्यात जायच असा आम्ही निर्णय घेतला


भूतकाळ सोडूनमी खिडकीतून बाहेर पाहिलपाऊस कमी झाला होता मुंबईच्या उंच इमारती मागे पडत गेल्याझाडं पावसात न्हाऊन टवटवितदिसत होतीसाचलेल्या पाण्यात मुलं मस्त मज़ा करत होतीकुत्री कुठल्यातरी आडोशाला अंग चोरून उभी होती आणी झालं….. तेवढ्यातबोगदा आलातुम्ही कधिही प्रवास करा गाडी बोगद्यात गेली नाकी कुठेतरी कुणीतरी आनन्दात किंकाळ्या मारतचआज मलाही गम्मत म्हणूनकिंकाळी ठोकावी अस वाटून हसायला आलबोगदा संपला आणी पुन्हा जोरदार पाऊस….


बाहेर -यापैकी अंधारलेलमी पाठीमागे थोडी रेलून बसलेगाडी पुढे पळत होती आणी माझे विचार मागेजुन्या आठवणीतमाधव आणी मीअेकाच कॉलेजला होतोतो सायन्स स्टूडन्ट आणी मी आर्ट्सला त्याच्या मागे दोन वर्ष

मी उत्साहीबडबडी आणी तो संवेदनशील आणी मितभाषी.

मी कल्चरल ग्रूपची सेक्रेटरी आणी तो कॉलेजचा सिंगररफीची गाणी काय सुन्दर गायचाआम्ही दोघे कधी प्रेमात पडलो ते लक्षातच आलनाही त्या गोड आठवणीत मी दीर्घ श्वास घेतला आणी बाजूच्या माणसानी लावलेल्यापरफ़्यूम चा धुंद करणारा वास मला जाणवलातोमाणूस थोडासा माझ्या बाजूला रेलला होता अस वाटल मलापण खर सांगायच तर थोड बर वाटल होत कारण खिडकीतून येणारा वारा आताअधीक बोचरा झाला होता


लग्ना आधीचा रोमान्स लग्ना नन्तर जमेनासा झालाअेकत्र कुटुम्बलहान घरदोघांच्या नोक-यानिनादच्या जन्मा नन्तरत्याची शाळाक्लासेसअेक्सट्रॉ अेकटिव्हिटीजआयुष्य धावत नव्हत तर उडत होतकणीक भिजवाभाजी चिराकुकर लावातसच प्रेम करासिनेमाकथाकादंबरीतल ‘ते’ प्रेम हरवतं का लग्ना नन्तरमी नकळत अेक उसासा साोडला


आता गाडीने चांगलाच वेग पकडला होतागाडी जोरदार हलत होतीमधेच त्या माणसानी माझ्या डोक्या मागून खिडकीच्या वर हात ठेवलात्याचा हलका स्पर्श मला जाणवला माझे  ते विचार आणी हा स्पर्शमनात गोंधळतरिही तो स्पर्श चुकवायला मी पुढे झुकून बसलेत्याचाचेहरा तसाच रुमालाने झाकलेलातो त्यातून मला पहातोय काकी माझ मन वाचतोय


आता तो हात माझ्या डोक्या कडून पाठीकडे ख़ाली आलादेहाला  होणारा स्पर्शतरी मन सुखावल..हा झोपते आहे की झोपेच नाटक करतमुद्दाम करतोय हेमी जरा  सावध झालेतेवढ्यात शिवाजी नगर स्टेशन आल आणी तो गडबडीत उठलात्याने माझ्याकडे अेक तिरका कटाक्षटाकलाच असणार!


मी गोंधळलेलीचिडलेली आणी तरिही रोमांचित होऊन सुखावलेलीपुण स्टेशन कधी आल ते समजलच नाही इतकी हरवलेली….स्टेशन बाहेरआलेपाऊस झिरमिरत होतामाधव मला घ्यायला आलेलाचप्पल तुटल्याने मी लंगडत होतेतो धावत आला “ काय झल त्याची काळजीमी तुटलेली चप्पल दाखवली त्याने मला पाठी मागून धरल आणी हसून  जवळ घेतलमी मात्र गप्पच


मस्त पाऊसगार हवाआपण दोघचतरिही तू अशी गप्प का?”  माधव लाडात येऊन म्हणालामी फक्त हसलेनेहमी अखंड बडबड करणारीमी गप्प होते आणी म्हणुनच की कायमाझा संवेदनशील आणी मितभाषी नवरा मला मूडमधे आणण्यासाठी खूप बोलत होतामाझे डोळेपाण्याने भरून आले


ओले कपडे काढून गाउन घातलामाधवने चहा बनवला होता पण “नकोमला आधी आंघोळ करुदे”, अस म्हणून मी बाथरूम गाठलडोक्यावरगरम पाण्याचा शॉवर सोडलाट्रेन मधला ‘तो’ मात्र मनात तस्साचशरिरा सारखच मन धुता आल असत तर….,  माधव चहासाठी माझी वाटपहातोय हे लक्षात घेऊन घाईने अंग पुसत मी बेडरूम मधे आले.


हॉल मधे माधव भलताच खुष होऊनफोनवर बोलत होता. “अरे ये रेअजून कुठे इतकी रात्र झालीययेये रात्रभर गप्पा मारू मस्त.” त्याच तेबोलण ऐकून लक्षात आल कुणी पाहुणा येतोयमी जरा बरे कपडे घातले. “चल चहा घे पटकन”, म्हणत माधव आत आला त्याचा शाळेतलाबालमित्र ‘वसंत’, जो आता अमेरिकेत असतो तो येतोय हे त्याने सांगितलखाणं बाहेरून मागवल पण तरिही थोड़ी तयारी करायला आम्ही किचनमधे आलो


थोड्याच वेळात दणाणून बेल वाजवत वसंत आलामाधवनी दार उघडल आणी हास्याचा गडगडाट करत त्या दोघांनी मिठी मारलीवसंतने खाऊम्हणून चक्क स्कॉच आणली होती. “आजची हवा पाहून हा खाऊ” डोळा मारत वसंत म्हणालागप्पांची महफिल सजलीवसंत आणी मीप्रथमच भेटत असुनही तस वाटल नाहीत्यांच्या गप्पा म्हणजे जुन्या आठवणीशाळेची धमाल मस्तीमला ऐकताना मजा वाटत होती.


व्हिस्कीचे त्यांचे दोन पेग झाले आणी मी अन्न गरम करायला कीचन मधे जायला उठले. “ मी आजच पुण्यात आलो यार” वसंत सांगत होतालहनपणीची मुंबई-पुणे ट्रेनची  मजा पुन्हा अनुभवायला मिळेल आणी पटकन पोचता येईल म्हणून तो चक्क ट्रेनने आला होता


कीचन मधून आत बाहेर करताना मी ऐकत होते “माधवआजच्या प्रवासाततन आणी मन दोन्ही भिजल यार..,

तिने साडी नेसली होतीबरीच भिजलीही होतीबसताना माझ्यावर थोड़ी आदळली बिचारीम्हणून जाणवल मला तेट्रेनच्या तुटक्या खिडकीतूनआत येणारा वारा …, थंडीने कुडकुडत होतीगाडीचा जुना डबाकाही दिवे उडालेलेतिला गुपचुप निरखता यावं म्हणून मी माझ्या चेह-या वरचारुमाल मुद्दामच हटवला नाहीकसल्यातरी गोड आठवणीत मग्न होऊन गोड हसत होती त्याने मी खलास!!!!! कळत नकळत जरासाच कललोतिच्या बाजूलाबहुदा तिलाही त्या गारठ्यात जरा बर वाटल असावं.”


वसंतच ते बोलण ऐकल आणी मी हादरले. “अच्छा म्हणजे हा तोचट्रेनचा माझा हमसफ़र?” आणी मग माझ्या मागे ठेवलेला तो त्याचा हातमाझ्या डोक्यात विचारांच काहूर उठल


तेवढ्यात माधव म्हणाला “ ती भिजलेलीतिला पाहून तू भिजलेला आणी हा किस्सा ऐकून आता मी भिजलेला

पुम्हणालेच आहेत की पाऊस अेकाच ठिकाणीअेकाच वेळी पडत असलातरी प्रत्येकाच भिजण वेगळ असत.!”

माधवच्या या वाक्यावर हास्याचा गड़गड़ाहट करत ते दोघे मनापासून हसले.


बाहेर पावसाचा जोर वाढला होतामाझ्या मनात विचार आला “भिजण्यासाठी हा असा पाऊस हवाच कातो असूनही काही भिजत नाहीतआणी ज्यांना भिजावस वाटत ते पावसाची वाट पहात नाहीत…..!”


चारुलता काळे 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

प्रवास वर्णनः ग्रीस 2

लेखः ओशो भाग ३